Nagpur rain news: नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, नदीकाठच्या घरांमध्ये शिरले पाणी, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

Nagpur Rain: नागपूर शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नागनदीला पूर आला आहे. ज्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहनतळावर लावलेली वाहनांमध्येही पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Nagpur rain news
Nagpur rain news

नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) सुटी जाहीर केली आहे.

नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा । A review of damage caused by cloudburst-like rains in Nagpur

  • नागनदीला पूर / Naga river floods
  • नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले
  • खास करुन संजीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील रहिवाशांना पुराच्या पाण्याचा फटका
  • काही घराच्या फाटकाच्या भिंती कोसळल्या
  • पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पुराचे पाणी

हेही वाचा : Vivo T2 Pro 5G: वीवो टी2 प्रो 5G भारतात लॉन्च, 64MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह

शासनाची उपाययोजना । Government measures

  • जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
  • सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment