IND vs PAK: टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

Ind vs Pak world cup 2023: आशियाई क्रिकेट काउंसिलने (ACC) अंडर-19 आशिया कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला होणार आहे. हा सामना 10 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे.

IND vs PAK

स्पर्धेचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 8 ते 17 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. साखळी फेरीतील सामने 8 ते 13 डिसेंबरदरम्यान होतील. त्यानंतर 15 डिसेंबरला सेमी फायनल आणि 17 ला अंतिम सामना पार पडेल.

स्पर्धेतील एकूण 15 सामन्यांचं आयोजन हे 3 स्टेडियममध्ये करण्यात आलंय. साखळी फेरीतील सर्व सामने हे आयसीसी एकेडमी ओव्हर 1 आणि 2 मैदानात आयोजित करण्यात आले आहेत. तर सेमी फायनल आणि फायनलचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

अंडर-19 आशिया कप स्पर्धेचं एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 2 ग्रुपमध्ये प्रत्येकी 4-4 हिशोबाने विभागण्यात आलं आहे. गतविजेता टीम इंडिया, पाकिस्तान नेपाळ आणि अफगाणिस्तान हे 4 संघ ग्रुप एमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये जपान, यूएई, बांगलादेश आणि श्रीलंकेचा समावेश आहे. नेपाळ, जपान आणि यूएईचा रँकिगमध्ये टॉप 3 मध्ये असल्याने समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेतील पहिला सामना हा टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यांना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंडर-19 क्रिकेटमध्ये एकमेकांविरुद्ध अनेकदा खेळले आहेत. दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीचा सामना होतो. यावेळीही दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment