Pune News: मराठा आरक्षण मोर्चामुळे वाहतूक कोंडीची शक्यता यामुळे वाहतुकीत झाले मोठे बदल

Manoj Jarange Patil: पुण्यातील मराठा आरक्षण मोर्चा येत्या 23 आणि 24 जानेवारी रोजी होणार आहे. या मोर्चामुळे पुण्यात वाहतुकीत मोठा बदल होणार आहे.

मोर्चा रांजणगाव येथून सुरू होऊन कोरेगाव पार्क मार्गे खराडी येथे मुक्काम करेल. त्यानंतर बुधवारी (दि.24) पिंपरी-चिंचवड मार्गे लोणावळा येथे जाईल. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी (Traffic Congestion Pune) होऊ नये यासाठी मोर्चा मार्गावर व परिसरात आवश्यकतानुसार वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. हे बदल मंगळवारी (दि.23) दुपारी तीन वाजता पासून लागू होतील.

अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येईल:

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव चौफुला – नाव्हरे- शिरुर मार्गे जातील.
वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथुन वाहतूक केडगांव चौफुला नाव्हरा मार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेवून सोलापूर रोडने यवत केडगांव चौफुला – नाव्हरे – शिरुर मार्गे जातील.

पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड (Change traffic in pune) आयुक्तालय हद्दीमध्ये जाणारी सर्व वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येईल:

अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळयाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी धानोरी लोहगाव वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.

मराठा आरक्षण मोर्चा (Maratha Reservation Morcha Pune) जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी वर नमुद वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil information in marathi

Leave a Comment