महिलेचा हात पकडणे म्हणजे विनयभंग नाही : केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

महिलेचा हात पकडणे म्हणजे विनय भंग नाही असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल जाहीर करताना सांगितले आहे.

वासनामुलक हेतूशिवाय एखाद्या महिलेचा हात पकडण्याचा कृत्याला विनय भंग म्हणता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

2013 मधील एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, यातील आरोपीने एका महिलेचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करताना त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यासह विनयभंगाचे कलमही लावण्यात आलेले होते. मात्र, आरोपीने कोणतेही असभ्य शब्द उच्चारले किंवा पिढीतील विचित्र पद्धतीने स्पर्श केल्याचे निष्पन्न झालेले नाही.

प्राण घातक हल्ल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करताना त्यात विनयभंगाच्या कलमाचाही समावेश करणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात आरोपीला संबंधित महिलेवर हल्ला केल्याबद्दल दोषी ठरविले आहे. तथापि, विनयभंगाचा विषय रद्दबाबत ठरविला आहे.

Leave a Comment