Wireless Emergency Alert: सर्वांना मिळालेला ‘इमर्जन्सी अलर्ट’ तुम्हाला मिळाला नाही? ‘हे’ आहे कारण; त्वरित बदला सेटिंग

Government emergency alert : २० जुलै २०२३ रोजी राज्यातील जवळपास सर्व स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हा अलर्ट पाठवला होता. त्यामुळे बरेच लोक हे गोंधळून गेलेले दिसून येत आहेत.

काही वेळातच सोशल मीडियावर या नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट देखील वायरल झालेला आपण पाहिलाच असेल.

ही नोटिफिकेशन म्हणजेच आणीबाणीच्या परिस्थितीत किंवा एखाद्या मोठ्या आपत्ती वेळी सर्व नागरिकांना एकाच वेळेस सूचना देता यावी यासाठी सरकारने एक यंत्रणा तयार केली आहे. या नोटिफिकेशन च्या माध्यमातून त्याची चाचणी घेण्यात आली होती. मग ठराविक लोकांनाच हे नोटिफिकेशन मिळाला आणि बाकीच्यांना नाही. असं का? तुम्हाला पण प्रश्न पडला असेल.

यासाठी तुमच्या फोनमधील सेटिंग असू शकतो कारण

तुम्हाला जर २० जुलै 2023 रोजीचा इमर्जन्सी अलर्ट आला नसेल, तर तुमच्या फोनमधील एक सेटिंग आहे का हे तपासणे गरजेचे आहे. फोन मधील वायरलेस इमर्जन्सी अलर्ट (Wireless Emergency Alert ) ही सेटिंग बंद असल्यास तुम्हाला भविष्यात देखील अशा प्रकारच्या धोक्याच्या सूचना मिळू शकणार नाहीत.

अशी बदला तुमच्या फोनची सेटिंग

तुम्हाला तुमच्या फोनची इमर्जन्सी सेटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून सेफ्टी आणि इमर्जन्सी हा पर्याय तुमच्या सेटिंग मध्ये शोधा.

यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्क्रोल डाऊन करून वायरलेस इमर्जन्सी अलर्ट ( Wireless Emergency Alert ) हा पर्याय निवडा. या ठिकाणी Allow Alerts हा पर्याय तुम्हाला बंद दिसेल. याच्या टागलवर टॅप करून हा पर्याय सुरू करा. यानंतर तुम्हाला वेळोवेळी इमर्जन्सी अलर्ट मिळतील. e

अलर्ट फीचर अनिवार्य

केंद्र सरकारने यापूर्वीच मोबाईल कंपन्यांना आपल्या स्मार्टफोनमध्ये हे इमर्जन्सी अलर्ट फीचर देन आणि अनिवार्य केल आहे. सरकारच्या आदेशानंतर देखील आपल्या फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एप्रिल महिन्यात सांगण्यात आले होते. यासाठी सरकारने कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत दिलेली होती.

आपल्या व्हाट्सअप वर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी आजच आपले Daily News 360 WhatsApp Magazine आजच जॉईन करा.

Leave a Comment